सायमन टॉफेल आणि मी... मग तो सिमॉन होतो
हा फोटो दिसतोय? त्यात काय दिसतंय? तीन चिअर लिडर आणि प्रत्येकीच्या बाजूला एक अम्पायर. असा एक फोटो त्याने दाखवला. मग त्याने सांगितलं एका अम्पायरने एका मुलीच्या कंबरेत हात घातलेत. दुसऱ्याने तिच्याकडे न पाहता शरिराच्या एका भागाकडे पाहिलंय आणि मी माझे हात दिसताहेत? पोरं जाम हसली आणि मी सुद्धा फुटले... खळखळून हसले. मागोमाग शब्द आला. 'फोकस', 'यू मस्ट फोकस्ड ऑन यूअर गोल' मुलं लक्ष देऊन ऐकू लागली. मी अम्पायरिंगमध्ये आलो ते मुली, खुबसुरत लडकी (ही अॅक्चुअली युस्ड दिस हिंदी वर्डस), पैसा किंवा मान सन्मानासाठी नाही तर मला उत्तम अम्पायर बनायचं होतं म्हणून. पैसे कमवण्यासाठी नोकरी करत असाल तर तुम्ही दमून जाल. त्याऐवजी तुम्ही आनंदासाठी नोकरी करा. तुम्ही त्यात नवीन काहीतरी कराल, आनंदी रहाल. सिमॉन टॉफेल (येस अॅक्चुअली सायमन टॉफेल) बोलत होता. त्याच्या लेक्चरच्या सुरुवातीलाच त्याने पकड घेतली होती.
भाई जोरदार वाटला. पोरं खुष होतीच.पण आता मी सुद्धा खुर्चीत सावरुन बसले. इतकं मोकळं लेक्चर असेल तर त्या लेक्चरमध्ये जगण्याचा आणि यशाचा वास्तववादी मार्ग दाखवणार याची खात्री असते, हे माझं सुत्र. ते सायमनच्या निमित्ताने पुन्हा एकदा खरं ठरलं.
सायमन टॉफेल 20 मार्चला मुंबईतल्या व्हिजेटीआयच्या टेक्नोवॅन्झा फेस्टमध्ये लेक्चर देण्यासाठी आला होता. ते लेक्चर मी अटेंड केलं. क्रिकेटबद्दल मला जरा जास्तच तिडीक आहे. का माहित नाही पण आहे. नुसतं गंमत म्हणून बॅटबॉल खेळायला आवडतं. सायमन टॉफेल च्या व्हिजेटीआयच्या लेक्चरला जायची असाईनमेंट लागली. मी भलतीच खुष झाले. सायमन टॉफेल हा अप्मायरिंगमधला 'परफेक्शनिस्ट' हे प्रशांतच्या तोंडून कधीतरी ऐकलं होतं. मग असाईनमेंट लागल्यावर मी गुगलही केलं. तर आयसीसीच्या अम्पायर ऑफ द इयर चा सन्मान पाच वेळा पटकावलेला अम्पायर त्याला ऐकायची संधी मिळणं म्हणजे परवणीच. मी मनोमन विचार केला हे लेक्चर क्रिकेटवर नसावं नाहीतर मला वेड लागेल.
पण, जेव्हा तो आला त्याच्या अत्यंत साधेपणामुळे ये कुछ अलग करेगा असं वाटलं. अनेकदा असं वाटल्यावर फसगतही होते हा अनुभव असल्याने अजून छान वाटत नव्हतं. काही नाही तर आपण त्याला पाहिलं असं तरी सांगता येईल हा दुसरा विचार मनात होता.
'नमस्ते' या शब्दाने त्याने बोलायला सुरुवात केली. एक दोन वाक्य बोलून त्याने 'मी फास्ट बोललो तर सांगा कारण ऑस्ट्रेलियातल्या लोकांना फास्ट बोलायची सवय असते. माझा अॅक्सेण्ट ठीक आहे ना?' असा प्रश्न करुन त्याने त्याच्या लेक्चरला सुरुवात केली. खुप हिंदी शब्द तो बोलला. फोटो च्या माध्यमातून किस्से सांगत त्याने त्याच्या अंपायरिंग क्षेत्रातल्या यशाचा मंत्र लोकांना दिला.
यावेळी त्याने मुनाफ पटेलचा किस्सा सांगितला. हा किस्सा लक्षात ठेवला म्हणजे सिमॉनच्या तोंडातून आलेली साला चुतिया ही शिवी . कॉलेजच्या आवारात लेक्चररने साला च्युतिया देण्याची ही माझ्या आयुष्यातली ही दुसरी वेळ (मी एका लेक्चरमध्ये चुतिया हा शब्द वापरला होता ;) शिवी न देताही मला बोलता येतं. खात्रीने सांगतेय ;) असो..) मुनाफ बॉलिंग करत होता आणि साऊथ आफ्रिकेचा बॅटिंग करणाऱ्या खेळाडूला (मला त्याचं नाव नाही लक्षात राहिलं सॉरी) त्याने साला चुतिया अशी शीवी दिली. त्यावेळी सिमॉन अंपायरिंग करत होता. सिमॉनने सांगितलं पलिकडचा कोणीतरी हिंदी माहिती असणारा खेळाडू होता आणि त्याने मुनाफला त्याने दिलेल्या शिवीबद्दल विचारलं. सायमनने तेव्हा सांगितलं मुनाफ आणि त्याचे चांगले रिलेशन आहेत. तेव्हा ते दोघं एकमेकांना साला असं हाक मारतात.
त्याच्या आवडत्या अम्पायरिंग हॅटबद्दलही त्याने सांगितलं.क्रिकेटीयर असलेल्या गाडीवर जेव्हा फायरिंग झालं तेव्हा खाली वाकून त्याने कसा जीव वाचविण्याबरोबर त्याची अम्पायरिंग कॅप चुरगळू नये म्हणून प्रयत्न केला वगैरे हे सुद्धा सांगितलं.
त्याच्या बोलण्यातील काही हायलाईट्स - टेक्नॉलॉजी महत्त्वाची आहे. क्रिकेटमध्ये आलेल्या टेक्नॉलॉजीने अम्पायरिंग, निर्णय घेणं सोप्प झालंय. पण अम्पायरिंगसाठी अलर्ट आणि जागृत असलंच पाहिजे. प्रॅक्टीस करताना टेक्नॉलॉजीची मदत घ्यायला नको.
क्रिकेटमधील मोठ्या खेळाडूंबद्दल त्याला काही प्रश्न विचारले तेव्हा 'मी खेळाच्या मैदानावर अंम्पायर असतो' असं बाणेदार उत्तर त्याने दिलं.
बोलताना प्रत्येक वेळी तो 'ठीक है' असं विचारायचा. बरेच हिंदी शब्द त्याने यावेळी उच्चारले.
बोलताना चेहऱ्यावर कोणताही माज नाही पण ठाम बोलणं. फक्त फोटो आणि अम्पायरिंग करताना आलेल्या अनुभवातून यशस्वी होण्याचे फंडे सांगत होता. छान वाटलं त्याला ऐकून. म्हणजे त्याला ऐकून मला स्पोर्टसाठीची बातमी लिहिण्याचा विश्वास मिळाला इतकं साधं आणि सोप्प बोलला हे वेगळं सांगायलाच नको.
तर सायमन टॉफेल हे नाव अनेकदा उच्चारलं जात असतानाही कुठूनतरी माझ्या डोक्यात ते सिमॉन टॉफेल असं बसलं. ते कॉपीत उतरलं आणि ती कॉपी मी पुढे पाठवलीही. बातमी वाचणाऱ्या गौरव दिवेकरचं आणि इतरांचं डोकं भंजाळलंच असेल. पण असो हेल्थ, कम्युनिटी वगैरे बघणाऱ्या माझ्यासारख्या क्रिकेटव्देष्ट्या मुलीला 5 चं लेक्चर असल्याचं कळलं तेव्हा 4.30 ला हजेरी लावली आणि लेक्चर 6 नंतर सुरू झालं.मधला वेळ मी व्हिजेटीआयच्या कॅम्पसमध्ये दोन इंटरेस्टींग मुलांमध्ये बसून मी पत्रकार असल्याचं कळू न देता गप्पा मारल्या. हे काय कमी आहे काय?
असो.. व्हिजेटीआयच्या कॅम्पसमध्ये ज्याचं लेक्चर ऐकायला गेले त्याच्याबद्दल अर्ध्या तासापूर्वी माहिती घेऊन बातमी कव्हर करणार होते. काय कळणार या लेक्चरमधलं असा प्रश्न मनात आला की लगेच मेंदूतून भ्रुम्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म असं ऐकू येत होतं. कॉलेजच्या तळमजल्यावरच्या एका खोलीत वाकून बघितलं तर मोठ्या मशिन्स दिसल्या. तेव्हाही तेच भ्रुम्म्म्मम्म्म. हे माहितीतूनच आलं होतं. थ्री इडियट्समधला सीन. व्हायरसच्या दरवाज्यावर कोण मुतलं याचा शोध घेण्यासाठी वर्गात आलेला व्हायरसला राजू रात्रभर अभ्यास करत होता असं रँछो जेव्हा सांगतो. तेव्हा व्हायरस त्याला विचारतो ना -' इन धिस केस हाव डस इंडक्शन मोटर स्टार्ट्स' आणि राजू (शर्मन जोशी) जसं रात्रीची न उतरल्यामुळे भ्रुम्ममममममम म्हणतो. अगदी तसंच सुरू होतं. पण हा भ्रुम्म्म्मम्म्म्ममम्म् माझ्या मनातून सिमॉनने काढलं होतं. आय मीन सायमनने काढला होता.
(त्यावेळी दोन बातम्या केल्या. त्यापैकी एक बातमीची लिंक देतेय. नक्की वाचा त्यात कळेल सायमन मराठी सुद्धा बोलला होता)

No comments:
Post a Comment