हर्षदा परब
सगळेजण फँड्री आणि नागराज मंजुळे याच्याबद्दल
बोलताहेत...मग म्हटलं आपण का गप्प बसावं...हो पण मी फँड्री पाहिलेला नाही. मात्र, मी नागराज मंजुळेचा इण्टरव्ह्यू घेतलाय.
त्या इण्टरव्ह्यूच्या आठवणी आणि जब्याची गोष्ट मला सारखी वाटली म्हणून हा किस्सा
शेअर करण्याचा मोह टाळता येत नाही.
तेव्हा मी एका चॅनलसाठी रिपोर्टिंग
करत होते. एण्टरटेन्मेण्ट बीटसाठी रिपोर्टींग करत होते. त्यावेळी नागराजची भेट
झाली.
नागराजने त्याची ‘पिस्तुल्या’ ही डॉक्युमेंट्री एका स्पर्धेत उतरवली
होती. त्याच स्पर्धेत त्याच्या मित्राची
घनदाट ही डॉक्युमेण्ट्री सुद्धा दाखल झाली होती होती. पिस्तुल्या ही पारधी
समाजातील एका मुलाची कथा होती. त्यात नागराजने एका पारधी मुलाकडून काम करवून घेतलं
होतं. डॉक्युमेण्ट्री काही त्या फेस्टिवलमध्ये पाहण्याची संधी मला मिळाली नाही. पण
नंतर मी ती डॉक्युमेण्ट्री माझ्या ऑफिसमध्ये पाहिली. दुर्दैवाने ती सीडी आज
माझ्याकडे नाही. त्या इण्टरव्ह्यूशी जोडलेल्या काही आठवणी मात्र अजूनही ताज्या आहेत.
चॅनलच्या एण्टरटेण्मेण्टमध्ये
डॉक्युमेण्ट्री या विषयाला किरकोळ स्थान असते. त्यातही प्रथितयश माणसाने केलेली
डॉक्युमेण्ट्री असेल तर त्या डॉक्युमेण्ट्रीचं नशिब खुलतं.
मी नविनच होते. त्या वयातही माझ्या
लेखी सामाजिक विषयाशी बांधिलकी वगैरे गोष्टी आऊटडेटेड नव्हत्या. तेव्हा घनदाट डॉक्युमेण्ट्री खूप चालली होती अशी
बाहेर चर्चा होती. मलाही ऑफिसमधून घनदाट डॉक्युमेण्ट्री केलेल्या व्यक्तीशी बोल
असं बजावून पाठवलं होतं. मी त्यांच्याशी बोलले. तेव्हा, त्यांनी माझी नागराजशी ओळख
करुन दिली.
एका काळा तरुण, कुरळे केसे
खांद्यापर्यंत. सोबत एक मुलगा. दोघेही साध्या कपड्यातले. मी त्या तरुणाचं नाव
विचारलं त्याने त्याचं पूर्ण नाव सांगितलं. त्याची डॉक्युमेण्ट्री, कथा सारंकाही
त्याने सविस्तर सांगितल. एण्टरटेण्मेण्ट शुटवेळी लोकांशी बोलताना येणारा बडेजाव
आणि खोटा भाव दोन्ही त्यात मिसिंग होतं. म्हणूनच की काय मीही जास्त वेळ बाईट
घेतला.
त्या तरुणाने त्याच्या
डॉक्युमेण्ट्रीत प्रमुख भूमिका असलेल्या मुलाची आवर्जून ओळख करुन दिली. ‘याला कॅमेराही माहित नव्हता’ त्या तरुणाने माहिती
दिली. तो तरुण भरभरुन बोलला.
मी माझ्या नेमाप्रमाणे बातमी केली.
डॉक्युमेण्ट्रीचे व्हिज्युअल्स होते. पण पुढचे दोन दिवस बातमी चॅनलवर गेलीच नाही.
मी बातमीचा पाठपुरावा केला तेव्हा मला उत्तर मिळालं होतं ‘याला टीव्हीवर कोण बघणार?’
एण्टरटेन्मेण्ट बीटचं एक चॅलेंज
तेव्हा मला कळलं. बातमीतले बाईट आणि फोनो दोन्हीसाठी माणसं सुंदर आणि ओळखीची
लागतात. पण माझ्या लेखी ती डॉक्युमेण्ट्री, डॉक्युमेण्ट्रीचा विषय आणि त्यात पारधी
समाजातल्या मुलाने काम केल्याची माहिती या बाबी सुंदर होत्या.
दरम्यान मी ज्या दोन डॉक्युमेण्ट्री
केलेल्या तरुणांचा बाईट घेतला होता त्यांनी फोन केला होता. आमची बातमी लागली का?
माझ्याकडे नाही हेच उत्तर होते.
मी माझ्यापरीने पाठपुरावा सुरू
ठेवला. त्या दोन तरुणांच नशिब बदललं एका रविवारने. रविवारी एण्टरटेन्मेण्टची बातमी
नव्हती. तेव्हा माझी बातमी लागली. झालं घोडं गंगेत न्हालं.
दोस्तांनो ज्याच्या दिसण्यामुळे
बातमी रखडली होती तो ‘पिस्तुल्या’चा दिग्दर्शक अं हं तुमच्या लाडक्या ‘फँड्री’चा दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे होता. हे सांगितलं तर आज तुमचा
विश्वास बसेल. कारण, आज त्याचा तास –तास इण्टरव्ह्यू घेण्यासाठी लोक रांगा लावत
असतील.
छान आठवण आहे. यालाच ’मोठ्यांच्या छोट्या गोष्टी’ म्हणतात! आता नागनाथ मोठा झाला आहे, त्यामुळे या घटनेकडे वाचक नागनाथच्या बाजूने बघतील. चॅनेलने असं करू नये, किंवा असं करणार्यांना चॅनेलने आवरायला हवं, असं कुणीही म्हणणार नाही.
ReplyDeletefandree pahila...khup aswasth karun gela...majha gaavache chitra samor ubhe rahile...hat's off to NAGNATH MANJULE...
ReplyDelete